Cheetah Helicopter Crash esakal
देश

Cheetah Helicopter Crash: अरुणाचल प्रदेशात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले; अपघातात दोन्ही पायलट शहीद

रुपेश नामदास

Cheetah Helicopter Crash: अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ आज ११च्या दरम्यान लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात कसा घडला याची माहिती अद्याप समोर आलेला नाही.

लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, बोमडिलाजवळ ऑपरेशनल उड्डाण करणाऱ्या हेलिकॉप्टरचा सकाळी 9.15 वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (एटीसी) संपर्क तुटला होता. त्यानंतर 'बोमडिलाच्या पश्चिमेला मंडलाजवळ ते कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर बचाव कार्यासाठी पथके पाठवण्यात आली. यावेळी अपघातात लेफ्टनंट कर्नल बीबी रेड्डी आणि मेजर जयंत या दोन पायलटांचे मृतदेह अपघातस्थळावरून सापडले आहेत.

गेल्या वर्षी देखील चित्ता हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता

यापूर्वी 2022 मध्ये देखील तवांगजवळ भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. या अपघातात दोन वैमानिकांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. 5 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास तवांगजवळील फॉरवर्ड भागात उड्डाण करणारे लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टरचा नियमित उड्डाण करताना अपघात झाला होता. दोन्ही वैमानिकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र एकाला वाचवता यश आलं नाही. लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असे मृत वैमानिकाचे नाव आहे.

सदर बातमीमधील फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा वापरण्यात आला होता. The quint या वेबसाईटने केलेल्या फॅक्टचेक मध्ये तो फोटो चुकीचा असल्याचे समोर आले. त्यामुळे बातमीतील फोटो अपडेट करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT