Afghanistan Plane Crash eSakal
देश

Afghanistan Plane Crash : अफगाणिस्तानात क्रॅश झालं भारतीय विमान? स्थानिक माध्यमांची माहिती; तालिबानने केली पुष्टी

भारताहून रशियाकडे जाणारं एक विमान अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sudesh

Indian Plane Crashed in Afghanistan : भारताहून रशियाकडे जाणारं एक विमान अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. तेथील स्थानिक माध्यम टोलो न्यूजने याबाबत माहिती दिली आहे. बदख्शां प्रांताच्या माहिती व सांस्कृतिक मंत्रालयाने याबाबत माहिती दिल्याचं टोलो न्यूजने म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान भारतातून मॉस्कोकडे निघालं होतं. अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतामध्ये हे विमान कोसळलं. येथील पोलिसांनी सांगितलं, की हे विमान काल रात्री रडारवरुन अदृश्य झालं होतं. यानंतर जिबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात हे विमान क्रॅश झालं. तालिबानने याची पुष्टी केली आहे. (Indian Plane Crash)

बदख्शां प्रांतातील माहिती मंत्रालय प्रमुखांनी सांगितलं, की याबाबत अधिक तपास करण्यासाठी एक शोधपथक पाठवण्यात आलं आहे.

'ते' विमान भारताचं नाही

दरम्यान, क्रॅश झालेलं विमान भारताचं नसल्याची माहिती DGCA ने दिली आहे. भारताच्या सर्व फ्लाईट्स वेळेवर आणि सुरळीत सुरू आहेत. हे विमान भारतामधूनच मॉस्कोकडे रवाना झालं होतं, मात्र हे भारतीय नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT