Srinagar To Sharjah Flight esakal
देश

Omicron : आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

भारत सरकारने नव्या गाईडलाईन्स केल्या जारी आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जगभरात आणि देशात ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता 15 डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने एक आदेश जारी करुन ही घोषणा केली आहे.

चारच दिवसापूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबरला भारत सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, ओमिक्रॉनच्या धोका लक्षात घेता आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

भारतात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. काही महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर 'वंदे भारत' विमान सेवा आणि कोव्हिड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू करण्यात आली.

भारत सरकारने नव्या गाईडलाईन्स केल्या जारी

भारत सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना चाचणी करणे अनिर्वाय असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT