International Tea Day Sakal
देश

International Tea Day : मोदींकडून प्रेरणा घेत मुस्लिम मुलीने सुरू केला टी-स्टॉल

मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि चहाला सुगीचे दिवस आले.

सकाळ डिजिटल टीम

International Tea Day : जगभरात चहा प्रेमींची संख्या कमी नाहीये. त्यात मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि चहाला सुगीचे दिवस आले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

जगभरात चहाचे आणि चहा बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला चहाचे प्रकार किंवा चहा बनवण्याच्या पद्धतीबद्दल नव्हे तर, मोदींपासून प्रेरणा घेत चहाचा स्टॉल सुरू करणाऱ्या एका मुस्मिम महिलेची गोष्ट सांगणार आहोत.

उत्तर प्रदेशातील बरेली येथे महबिस या मुस्लिम महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने चहाचे दुकान सुरू केले आहे. ज्यावेळी महबिस यांनी अशा प्रकारचा स्टॉल सुरू करण्याचा विचार मांडला त्यावेळी नातेवाईकांसह अनेकांनी विरोध केला. मात्र, तिच्या या निर्णयाला तिच्या कुटुंबियांनी पाठिंबा दिल्याने उत्साह वाढल्याचे महबिस सांगतात.

आज महबिसने समाजातील लोकांकडून मिळणाऱ्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून आपला व्यावसायाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. एवढेच नव्हे तर, तिच्या याच वेगळेपणामुळे आज महसिबने संपूर्ण उत्तर प्रदेशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

चाय चस्का विथ बन मस्का

महबिसने बरेलीमधून इंटरमिजिएट उत्तीर्ण झालेल्या महबिसने एसएसपी कार्यालयाजवळ 'चाय चस्का विथ वन मस्का' नावाचा चहाचा स्टॉल सुरू केला आहे. आज या स्टॉल शहरभर प्रसिद्ध झाला आहे. दूरदूरवरून अनेकं चहाप्रेमी येथे चहा प्यायला येतात. विशेष म्हणजे महबिसच्या स्टॉलवर 6 हून अधिक फ्लेवर्सचा चहा उपलब्ध आहे.

सोशल मीडियावरून कल्पना आली

महबिशने सांगितले की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या चवींचा चहा विकण्याची कल्पना सुचली. युट्यूबवर ग्रॅज्युएट चाय वालीचा व्हिडिओही पाहिला. त्यानंतर या कल्पनेवर काम करत त्यांनी 'चाय चस्का विथ वन मस्का' नावाचे दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. आज याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

Kolhapur Bullock Cart Race : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार! 82 गाड्यांचा सहभाग; कोल्हापूरच्या 'सतेज-ऋतू' शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर? वाचा विजेत्यांची यादी

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

2G Ethanol Uses : शेतीतील कचऱ्यापासून तयार होणार नवे इंधन! 2G इथेनॉलमुळे शेतकऱ्यांसह कोणकोणत्या क्षेत्राला फायदा?

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

SCROLL FOR NEXT