Giorgia Meloni Esakal
देश

Giorgia Meloni: जॉर्जिया मेलोनी यांच्या 'मेलोडी' सेल्फीला, पंतप्रधान मोदींचा 'डिलाईट' रिप्लाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुबई येथे आयोजित सीओपी२८ परिषदेसाठी युएईमध्ये गेले होते. यावेळी त्यांची आंतरराष्ट्रीय नेत्यांची भेट झाली

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुबई येथे आयोजित सीओपी२८ परिषदेसाठी युएईमध्ये गेले होते. यावेळी त्यांची आंतरराष्ट्रीय नेत्यांची भेट झाली. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा सेल्फी पोस्ट केला होता. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मित्रांसोबत भेटणं नेहमी आनंददायी असतं असं मोदी म्हणाले आहेत.

जॉर्जिया मेलोनी यांनी सीओपी२८ परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सेल्फी काढला. तसेच मोदींसोबतची सेल्फी पोस्ट करत 'चांगले मित्र' अशी टिप्पणी केली होती. तसेच मोदी आणि मेलोनी आडनावाला एकत्र करत मेलोडी असा हॅशटॅग देखील वापरला होता. फोटोमध्ये दोन्ही नेते दिलखुलास हसताना दिसत आहेत.

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी शेअर केलेल्या फोटोला खूप पसंदी मिळत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत या फोटोला तीन लाखांपेक्षा अधिल लोकांनी लाईक केलंय, तर १६ हजार पेक्षा अधिक लोकांनी कमेंट केलं आहे. विषेश करुन यात भारतीय नागरिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. ५५ हजार लोकांनी याला रि-पोस्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला २४ लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे.

याआधी सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेलोनी भारतात आल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांची त्यांनी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांनी दोन देशातील राजनैतिक संबंधांना ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने समाधान व्यक्त केलं होतं. आंतरराष्ट्रीय विकासासाठी जी-७ आणि जी-२० देशांशी सोबत काम करण्याच्या विचारावर त्यांनी सहभती दर्शवली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT