Manish Sisodia Letter file photo
देश

"पंतप्रधानांचं कमी शिक्षण देशासाठी घातक!" सिसोदियांनी तुरुंगातून देशवासियांना लिहिलं पत्र

रुपेश नामदास

Manish Sisodia Letter: दिल्लीच्या कथित 'मद्य धोरण घोटाळ्यात' तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया यांनी तिहार जेल मधून पत्र लिहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे, या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान कमी शिक्षित असणे देशासाठी धोकादायक आहे. मोदींना शिक्षणाचे महत्त्व समजत नाही, त्यांनी गेल्या काही वर्षांत देशभरातील 60,000 शाळा बंद केल्या आहेत.

सिसोदियांनी पत्रात काय म्हटले?

मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून देशवासीयांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान मोदींच्या घटनात्मकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान कमी शिकलेले असल्याने विविध देशातील राष्ट्राध्यक्ष त्यांना मिठी मारतात आणि कागदपत्रांवर सह्या करायला लावतात कारण पंतप्रधान कमी शिकलेले असल्याने त्यांना समजत नाही.

आज देशातील तरुण महत्त्वाकांक्षी आहे, तो काहीतरी कराण्याची संधी शोधत आहे, त्याला जग जिंकायचे आहे. त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काही वेगळं करायच आहेत. आजच्या तरुणांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता कमी शिकलेल्या पंतप्रधानात आहे का? मागील काही वर्षांत देशभरात 80,000 सरकारी शाळा का बंद करण्यात आल्या? एकीकडे देशाची लोकसंख्या वाढत असताना सरकारी शाळांची संख्याही वाढायला पाहिजे होती.

दिल्लीतील कथित दारु घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुगांत न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी होळीच्या दिवशी एक ट्विट केल्यानं खळबळ उडाली होती.

सिसोदिया यांनी ८ मार्च रोजी ट्विट केलं होतं की, आत्तापर्यंत ऐकलं होतं की देशात शाळा सुरु होतात तेव्हा तुरुंग बंद होतात. पण आता या लोकांनी तर देशात शाळा सुरु करणाऱ्यांनाच तुरुंगात बंद करणं सुरु केलं आहे. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता.

यावर भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी सिसोदियांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं की, तुरुंगात मनिष सिसोदिया यांच्याकडं फोन आहे का? कारण २६ फेब्रुवारीला सीबीआनं ताब्यात घेतल्यानंतर आत्तापर्यंत सिसोदिया यांनी एकही ट्विट केलं नव्हतं. यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन होळीच्या दिवशी संध्याकाळी पहिल्यांदाच ट्विट करण्यात आलं. यामुळं राजकीय गदारोळ माजला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT