देश

Encounter : उरीमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन घुसखोरांचा खात्मा

संतोष कानडे

नवी दिल्लीः उत्तरी काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यामधील उरीतल्या गोहलान भागात भारतीय सेना आणि संयुक्त सुरक्षा दलांच्या जवानांनी घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा यंत्रणांनी उरीच्या जवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे दोघेही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते.

ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या बाबतीत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सुरक्षा यंत्रणा याबाबतचा तपास करत आहे. यापूर्वी बुधवारी २१ जून रोजी बालामुला येथील चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ते दोघेही तष्कर-ए-तय्यबाशी जोडलेले होते.

दुसरीकडे, अमरनाथ यात्रेसाठी निमलष्करी दलाच्या 24 अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. जम्मू जिल्ह्याला यावेळी निमलष्करी दलाच्या 24 अतिरिक्त कंपन्या मिळाल्या आहेत, ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहाने अधिक आहेत.

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर प्रथमच यात्रेकरूंची थांबण्याची ठिकाणे आणि इतर भागांमध्ये निमलष्करी दल देखील तैनात केले जात आहेत. ज्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमधील कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, मात्र राज्यातल्या मराठी १२५ शाळा बंद; SC न्यायमूर्तींनी सुनावले खडे बोल

Maratha Reservation: जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत; मंत्री विखे पाटील, सामंत, देसाईंची चर्चा

Duleep Trophy 2026 : इशान किशनची यष्टीमागे कमाल; वाऱ्याच्या वेगाने केली स्टम्पिंग Video Viral; शाहबाज, घरामीची शतकं...

Marathi News Live Updates : भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी तेलंगणातील हैदराबाद येथील टाटा लॉकहीड मार्टिन एरोस्ट्रक्चर्स लिमिटेड प्रकल्पाला भेट दिली

‘चॅनेलमधल्या कुणाचातरी राग...’ दयाने सांगितलं CID बंद होण्याचं खरं कारण; म्हणाला-

SCROLL FOR NEXT