Jaya Bacchan ANI
देश

लाल टोपीला घाबरल्याने उद्घाटनांचा धडका, जया बच्चन यांची मोदींवर टीका

काशी विश्वनाथ मंदिर चांगल्या प्रकार बांधण्यासाठी तेथील छोटी-छोटी दुकाने होती ती तुम्ही हटवली. तुम्ही त्यांना मोबदला दिला का?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जसे-जसे उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसे-तसे लाल टोपीला इतके घाबरले आहेत, की लोकार्पण आणि उद्घाटनांचा धडका लावला असल्याची टीका समाजवादी पक्षाच्या खासदार तथा अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह योगी आदित्यनाथ सरकारवर केली आहे. त्या आज सोमवारी (ता.१३) एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. पुढे बच्चन म्हणाल्या, काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) चांगल्या प्रकार बांधण्यासाठी तेथील छोटी-छोटी दुकाने होती ती तुम्ही हटवली. तुम्ही त्यांना मोबदला दिला का?, असा प्रश्न त्यांनी योगी सरकारला विचारला आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) लाल टोपीपासून धोका असल्याचे उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात म्हटले होते. (Jaya Bachchan Criticize PM Narendra Modi And Yogi Adityanath)

त्यालाही जया बच्चन यांनी काही दिवसांपासून प्रत्युत्तर दिले होते. आज मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ते म्हणाले, काशीतील सर्व बंधूंसह बाबा विश्वनाथांच्या चरणी आम्ही नमन करत आहोत.

आपल्या पुराणांमध्ये म्हटले आहे, की जो कोणी काशीत प्रवेश करतो तो सर्व बंधनांमधून मुक्त होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT