देश

जोधा-अकबर यांच्यात प्रेम नव्हतं, जिममध्ये भेटले का? भाजप आमदाराचे वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

जोधा आणि अकबर यांच्यात प्रेम नव्हतं. काय होतं? कुठं भेटले होते? कॉफी हाउसमध्ये? जिममध्ये? असे प्रश्नही भाजप आमदाराने उपस्थित केले.

भाजप आमदार आणि हिंदुत्ववादी नेते रामेश्वर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. अकबर आणि जोधा यांच्यात प्रेम नव्हतं. सत्तेसाठी हे लग्न झालं असं विधान रामेश्वर यांनी केलं आहे. रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं की, अकबराला आजही महान म्हटलं जातं, पण महाराणा प्रतापच्या त्या वंशजांबद्दल सांगितलं जात नाही जे जीव वाचवण्यासाठी जंगलांमध्ये लपून बसले.

शर्मा यांनी हिंदुत्व धर्म संवादात बोलातना अकबर जोधा यांच्या प्रसंगाच्या संदर्भावेळी राजपुतांवर ही टीका केली. त्यांनी म्हटलं की, सत्तेसाठी मुलींवर डाव लावणाऱ्या लुटारुंपासून सावध राहण्याची गरज आहे. या लोकांनी आपले असतानाही धर्माला धोका दिला.

जोधा आणि अकबर यांच्यात प्रेम नव्हतं. काय होतं? कुठं भेटले होते? कॉफी हाउसमध्ये? जिममध्ये? असे प्रश्नही भाजप आमदाराने उपस्थित केले. तसंच सत्तेच्या लालसेपोटी मुलीला डावावर लावतील.. अशा लुटारूंपासून सावध रहा असंही रामेश्वर शर्मा यांनी यावेळी म्हटलं होतं.

दरम्यान, रामेश्वर यांना हे वक्तव्य महागात पडलं आहे. त्यांच्या भाषणाच्या काही भागाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर शर्मा यांनी राजपूत समाजाची माफी मागितली आणि म्हटलं की, मुघलांची हुशारी, फोडा आणि राज्य करा नितीच्या संदर्भात हे वक्तव्य केलं होतं. राजपूत समाज हिंदुत्त्वाचे रक्षक आहेत आणि त्यांच्या क्षत्रिय वीरांचा देशाला नेहमीच अभिमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Iran US Conflict: पश्चिम आशियातील तेल निर्यात रोखू; नाकेबंदीनंतर इराणचा इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पर्वती येथील शाहू वसाहत एसआरए प्रकल्पावरील सुनावणी आज; नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

बारामतीत कारची वारकऱ्याला धडक, अपघातात वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू

Nagpur Tiger Census: आनंदाची बातमी! नागपूरच्या जंगलात वाघांची डरकाळी; पहिल्याच अधिकृत गणनेत 42 ते 45 वाघांची नोंद

SCROLL FOR NEXT