Supreme Court esakal
देश

Supreme Court : 'टिंडर' अन् 'किंडल'च्या घोळात अडकले सुप्रीम कोर्टाचे जज; कोर्टरुममध्ये घडला मजेदार किस्सा

सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द आहेत. मात्र त्यातील शब्दसंगतीमुळे अनेकदा शब्दघोळ होऊन जातो. टिंडर आणि किंडलच्या बाबतीत तसंच झालं. तेही चक्क सुप्रीम कोर्टात. कोर्टरुममध्ये न्यायमूर्तींनी किंडलच्या ऐवजी चक्क टिंडर शब्द वापरला.

संतोष कानडे

Supreme Court News : सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द आहेत. मात्र त्यातील शब्दसंगतीमुळे अनेकदा शब्दघोळ होऊन जातो. टिंडर आणि किंडलच्या बाबतीत तसंच झालं. तेही चक्क सुप्रीम कोर्टात. कोर्टरुममध्ये न्यायमूर्तींनी किंडलच्या ऐवजी चक्क टिंडर शब्द वापरला.

अमेझॉनने लाँच केलेलं किंडल हे गॅझेट सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या माध्यमातून पुस्तकं वाचली जातात. तर टिंडर हे सोशल मीडिया App आहे. तरुण-तरुणी डेट करण्यासाठी या अॅपचा वापर करतात. तरुणांमध्ये टिंडरचा बोलबाला असतो. याच Appचा चुकून उल्लेख झाल्याने कोर्टरुमध्ये हशा पिकला.

शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टात हा प्रसंग घडला आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्यासह न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार एका प्रकरणाची सुनावणी घेत होते.

बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड (एओआर) स्वाती जिंदल यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेत मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी गावात ई- वाचनालय उभारण्यासाठी आणि देशभरातील गावांमध्ये वाचन चळवळ वृद्धींगत करण्याची मागणी करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात एका महिन्यापूर्वी सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस पाठवल्या आहेत. त्यानंतर महिन्याभराने या प्रकरणात सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजीत बॅनर्जी यांनी कोर्टात सांगितलं की, ई-लायब्ररी उभारणं आणि पुस्तकांच्या डिजिटलायझेशनची योजना सुरु आहे. यावर न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार जे बोलले त्यामुळे कोर्टरुममध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले की, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, पुस्तकाचं पान पलटल्यानंतर जे समाधान मिळतं ते या नवीन पुस्तकामुळे मिळेल का? तुम्ही त्याला काय म्हणता टिंडर?

यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सांगितले की, सर त्या ॲपचे नाव किंडल आहे. यानंतर न्यायमूर्ती कुमार हसत हसत म्हणाले, 'होय, टिंडर एक डेटिंग ॲप आहे.' अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, वापराच्या पारंपारिक पद्धती बदलल्या पाहिजेत कारण आता सर्वच ई-फॉर्ममध्ये उपलब्ध आहे, अगदी द इकॉनॉमिस्ट सारख्या व्यावसायिक प्रकाशनांमध्येसुद्धा असाच वापर केला जातो. न्यायमूर्तींच्या चुकीच्या शब्दप्रयोगामुळे कोर्टरुममध्ये हशा पिकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

Latest Marathi Update : भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

Auto Rickshaw Driver Killed : गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव! गिरगाव डोंगरात रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Pune News: बारामतीत माणुसकीचे दर्शन! रस्त्यात अपघात पाहताच सुनेत्रा पवार थांबल्या; जखमी तरुणीला तत्काळ रुग्णालयात केलं दाखल

SCROLL FOR NEXT