kanhaiya kumar Team eSakal
देश

कन्हैया कुमारचा राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

अनेक दिवसांपासून कन्हैयाच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या.

सुधीर काकडे

जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैया कुमार तसेच गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु होती. "आम्ही या तरुण नेत्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत, कुमार आणि मेवानी, या देशातील सत्ताधारी फॅसिस्ट शक्तींना पराभूत करण्यासाठी लढणार," असे मत काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केले.

यापुर्वीच २८ सप्टेंबर रोजी त्यांचा पक्ष प्रवेश होईल, अशी माहिती एएनआयच्या वृत्तामधून मिळाली होती होती. कन्हैया कुमारने काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे कन्हैया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाल्या होत्या. २०१९ साली कन्हैया कुमारनं बिहारमधील बेगुसराय मतदार संघातून भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. तसेच जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनीधी म्हणून त्याची कारकीर्द गाजली होती. देश विरोधी नारे दिल्याच्या आरोपामुळे काही काळ तो वादात सापडला होता.

जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय अचानक घेतल्याचं यामुळे दिसून आलं आहे. जिग्नेश मेवाणी हे गुजरातचे आमदार आहेत. मेवाणी यांनी देखील वारंवार भाजपचा विरोध केल्याचे पाहायला मिळाले आहे. तर गुजरातमधील पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेलने देखील काही दिवसांपुर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT