Karnataka assembly elections BJP jp nadda change political strategies to aggressively respond to Congress  Sakal
देश

Karnataka Assembly Election : कर्नाटकमध्ये भाजपच्या रणनितीत बदल; नड्डांनी बोलािवली सरचिटणीसांची बैठक

काँग्रेसच्या तयारीला प्रत्युत्तर देणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तयारीला आक्रमक प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने राजकीय धोरणांमध्ये बदलाची तयारी केली आहे. यासाठी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ४ एप्रिलला सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे.

कर्नाटकमध्ये भ्रष्टाचार, सत्ताविरोधी वातावरण यासारख्या मुद्द्यांवर भाजपला घेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसने आता राहुल गांधींच्या अपात्रतेनंतर सहानुभूती मिळविण्यासाठीची रणनीती आखली आहे.

त्यामुळे भाजपने आपल्या रणनितीमध्ये बदलाची तयारी चालविली असून त्यासाठीची ही बैठक होणार आहे. कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस अरुण सिंह यांच्यासोबतच पक्षाचे कर्नाटक निवडणूक प्रभारी असलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, सहप्रभारी मनसुख मंडाविया आणि कर्नाटकची विशेष जबाबदारी देण्यात आलेले तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई हे उपस्थित राहतील.

यासोबतच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज बोम्मई आणि प्रचार समितीच्या प्रमुख शोभा करंदलाजे या देखील उपस्थित राहू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अलीकडेच झालेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात, २२४ विधानसभेच्या जागा असलेल्या या राज्यात काँग्रेसला ११५ ते १२७ जागा तर भाजपला केवळ ६० ते ८० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. किंगमेकर बनू पाहणाऱ्या धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या वाट्याला २३ -३५ जागाच येतील, असेही या सर्वेक्षणात भाकीत वर्तविण्यात आले आहे.

हा अंदाज भाजपची चिंता वाढविणारा आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपची सरचिटणीसांची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये भाजपच्या स्थापनादिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने कर्नाटकमध्ये मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल यावरही चर्चा अपेक्षित आहे.

अद्याप भाजपची यादी जाहीर नाही

कर्नाटकमध्ये होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप हे बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या मुद्द्यांबरोबरच धार्मिक ध्रुवीकरणाच्या भोवती फिरणारे आहेत. काँग्रेसने १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार त्याच प्रमाणे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना मैदानात उतरविले आहे. मात्र, भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT