Jagadish Shettar narednra Modi and Amit Shah 
देश

Karnataka Election : मला तिकीट न दिल्यास BJPला २० ते २५ जागांचा फटका; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

रवींद्र देशमुख

हुबळी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी बंडाचे निशाण फडकवत, आपल्याला तिकीट नाकारल्यास राज्यात भाजपला किमान 20 ते 25 जागांवर पराभवाचा सामना करावा लागेल, असं म्हटलं.

भारतीय जनता पार्टी (भाजप) हायकमांडने शेट्टर यांना हुबली-धारवाड मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी मागे घेण्यास सांगितले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते शेट्टर यांनी शुक्रवारी रात्री पत्रकारांशी बोलताना सांगितले की, तिकीट देण्याबाबत पक्षाच्या निर्णयाची रविवारपर्यंत वाट पाहणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे.

हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघासह कर्नाटकातील १२ विधानसभा जागांसाठी भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. "मी उद्यापर्यंत वाट पाहणार आहे. त्यानंतर माझी पुढील कृती ठरवेन," असे शेट्टर यांनी सांगितले.

What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अशाप्रकारे वागळण्याचा भाजपवर काय परिणाम होईल, असे विचारले असता ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी याचा विचार करावा.

शेट्टर म्हणाले, “पक्षाला कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. याचा परिणाम फक्त एकाच मतदार संघावर होणार नाही... उत्तर कर्नाटकातील अनेक मतदारसंघांवर त्याचा तात्काळ परिणाम होईल. किमान 20 ते 25 मतदारसंघात भाजपला नुकसान सहन करावे लागणार, असा इशाराही शेट्टर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT