RSS sakal
देश

RSS: कर्नाटकच्या कॅबिनेटचं शिक्कामोर्तब! शालेय पुस्तकातून अखेर RSS संबंधीचा धडा वगळणार

कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री मधू बंगरप्पा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बंगळुरु : कर्नाटकमध्ये सत्ता आल्यानंतर कर्नाटकातील शालेय पुस्तकातील RSSचे संस्थापक हेगडेवार यांचा उल्लेख वगळण्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कर्नाटकच्या कॅबिनेटनं याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतची माहिती शिकवली जाणार नाही. (Karnataka Cabinet has decided to remove school textbook lessons on RSS)

कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री मधू बंगरप्पा यांनी याबाबत माहिती देताना सांगितल की, कर्नाटक कॅबिनेटनं ठरवलं आहे की शाळेच्या पुस्तकातील रा. स्व. संघाचे (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेगडेवार आणि इतरांवरील धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्याचा दिला होता इशारा

शिक्षण मंत्री मधु बंगरप्पा यांनी नुकतचं जाहीर केलं होतं की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी याच वर्षी शालेय पुस्तकांची समीक्षा केली जाईल. लवकरच ही बाब मंत्रिमंडळासमोर ठेवली मंजुरीसाठी ठेवली जाईल. काँग्रेसनं आपल्या निवडणूक घोषणापत्रात आश्वासन दिलं होतं की. भाजपनं सत्तेत असताना शालेय पुस्तकात केलेल्या बदलांना तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्यात येईल.

बंगरप्पा यांनी म्हटलं होतं की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे या प्रकरणात वैयक्तिकरित्या पुढाकार घेत आहेत. आमच्या निवडणूक घोषणापत्रात ज्याचा मी अध्यक्ष होतो, त्यात ही बाब स्पष्ट स्वरुपात लिहिली देखील आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी शालेय पुस्तकांची समिक्षा करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

Dhruv Rathee: सुनावणीपूर्वीच युट्युबर ध्रुव राठी लंडनला रवाना; दिल्लीच्या साकेत न्यायालयाकडून वॉरंट जारी

Latest Marathi News Live Update : पुण्यात राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांसह 10 ते 11 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या चॅम्पियनची 'एक्झिट'! ३ ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या दिग्गजाने सोडली टीमची साथ

FSSAI Notice: ऑनलाइन शॉपिंग करता? Flipkart, BigBasketला FSSAIची नोटीस! खाद्यपदार्थांबाबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT