rahul gandhi bharat jodo yatra sakal
देश

Congress Twitter: काँग्रेसचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या निर्णयाला स्थगिती; हायकोर्टाचा दिलासा

KGF सिनेमातील संगिताचा वापर केलेला व्हिडिओ शेअर केल्यानं काँग्रेसला कारवाईला सामोरं जावं लागणार होतं.

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरु : काँग्रेसचं ट्विटर हँडल तात्पुरतं ब्लॉक करण्याच्या सत्र न्यायालयाच्या कालच्या निर्णयाला कर्नाटक हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या ताज्या निर्णयामुळं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनदरम्यान कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळं काँग्रेसला या कारवाईला समोर जावं लागणार होतं. (Karnataka High Court stays order directing Twitter to block Congress)

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या एका व्हिडिओत KGF Chapter 2 सिनेमातील एका गाण्याचा वापर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसच्या ट्विटर हँडल आणि भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला होता. यामुळं कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंगळूरुच्या कमर्शिअल कोर्टानं काल ही दोन्ही ट्विटर हँडल तात्पुरती ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. यानंतर काँग्रेसनं हा आक्षेप घेतलेला कंटेन्ट उद्यापर्यंत आपल्या ट्विटर, फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्राम हँडलवरुन हटवण्यात येईल, अशी हमी दिल्यानं कर्नाटक हायकोर्टानं अकाऊंट ब्लॉकच्या निर्णयाला स्थिगिती दिली आहे.

यासंदर्भात MRT म्युझिक कंपनीनं कोर्टात धाव घेतली होती. आपल्या याचिकेत त्यांनी आरोप केला होता की, काँग्रेसनं आमच्या सुपरहिट KGF 2 सिनेमातील एका गाण्याचा वापर भारत जोडो यात्रेतील एका व्हिडिओमध्ये केला आहे. यावर कोर्टानं या कंपनीला याचे पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार कंपनीनं या गाण्याची ओरिजिनल सीडी आणि काँग्रेसचा व्हिडिओ देखील कोर्टात सादर केला.

हेही वाचा : कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

प्राथमिक पुराव्यांच्या आधारे कोर्टानं काँग्रेसला आपल्या सोशल मीडियावरुन गाण वापरलेल्या लिंक काढून टाकण्याचे आदेश देत काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT