Kavi Kumar Vishwas news in marathi-Name in discussion for Rajya Sabha-Uttar Pradesh Yogi Adityanath- 
देश

Kavi Kumar Vishwas: राज्यसभेसाठी कवी कुमार विश्वास यांचे नाव! भाजपने तयार केलेल्या यादीत आहेत दावेदार 

Kavi Kumar Vishwas: उत्तर प्रदेशात राज्यसभेत १० जागा खाली आहे. यासाठी उत्तर प्रदेश भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी ३५ नावांची यादी तयार केली आहे.

Sandip Kapde

Kavi Kumar Vishwas: उत्तर प्रदेशात राज्यसभेत १० जागा खाली आहे. यासाठी उत्तर प्रदेश भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी ३५ नावांची यादी तयार केली आहे. यामध्ये कवी कुमार विश्वास प्रमुख दावेदार आहेत. सुधांशू त्रिवेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडताना या कुमार विश्वास यांच्या नावाचीही चर्चा करण्यात आली आहे.

राज्यसभेच्या जागांवर पुन्हा एकदा भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात थेट लढत पाहायला मिळू शकते. सध्या दोन्ही पक्षांना अनुक्रमे सात आणि तीन जागा मिळणे अपेक्षित आहे. तर उत्तर प्रदेश भाजपने राज्यसभेच्या ७ जागांसाठी ३५ नावांची यादी तयार केले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या नावावर चर्चा झाली. भाजपने सात जागांसाठी ३५ उमेदवारांचे पॅनल तयार केले असून, त्यात सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाचाही समावेश आहे. तर कुमार विश्वास यांचेही नाव पॅनेलमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. 

कुमार विश्वास गाझियाबादमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. आता अशा परिस्थितीत त्यांना राज्यसभेवर पाठवणार की लोकसभेसाठी उमेदवारी करणार यावर सस्पेन्स कायम आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : टीएमसी कार्यालयात गोंधळ उडाला

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT