Kerala Governor Arif Mohammed Khan accused Chief Minister Pinarayi 
देश

केरळच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर केले खळबळजनक आरोप; म्हणाले, माणसं पाठवून मला...

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सोमवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना इजा करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सोमवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना इजा करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या वाहनावर कथित हल्ला करण्यात आल्याच्या घटनेनंतर राज्यपालांनी हा दावा केला आहे. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या Students Federation of India (SFI) कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या वाहनावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यावेळी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammed Khan) हे वाहनामध्येच बसले होते. राज्यपालांनी आरोप केलाय की, त्यांना शारीरिक इजा करण्यासाठी काही लोकांना पाठवण्यात आलं होतं.

राज्यपालांनी दावा केलाय की, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या आदेशाने काही लोक त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. या लोकांनी त्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवले. तसेच त्यांच्या वाहनाला धडक दिली. आमचा ताफा जात असताना मार्गात येण्यास कोणालाही परवानगी नव्हती. तरीही काही लोकांना आतमध्ये सोडण्यात आले. त्यांनी कारला धडक दिली आणि पळून गेले.

हल्ल्यामागे मुख्यमंत्री आहेत हे मी नक्की सांगू शकतो. ते माझ्याविरोधात कट रचत आहेत. गुंडांनी तिरुवनंतपूरमच्या रस्त्यांचा ताबा घेतला होता, असं राज्यपाल म्हणाले. राज भवनच्या सूत्रांच्या माहितीनुसार, तीन ठिकाणी खान यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. दोन ठिकाणी त्यांच्या वाहनाला धडक मारण्यात आली. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला होता.

दरम्यान, काँग्रेस, भाजप यांनी देखील विजयन यांच्यावर टीका केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असून हल्ल्यामागे मुख्यमंत्र्याचा हात असल्याचा आरोप केलाय. विरोधीपक्षांनी आरोप केलाय की, केलेला आरोप गंभीर असून याप्रकरणी दोषी पोलिसांवर देखील कारवाई करण्यात यावी. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT