corona updates today 
देश

केरळमध्ये तिसरी लाट? 24 तासांत 23 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

देशात कोरोना महामारी पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. स्थिर झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. केरळ राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचं दिसत आहे. मागील दोन महिन्यात एखाद्या राज्यात 24 तासांत वाढलेल्या रुग्णसंख्यापैकी सर्वाधिक रुग्णसंख्या केरळमध्ये आहे. मागील 24 तासांत केरळमध्ये 23 हजार 600 कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशाच्या रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण आहेत. केरळमधील वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे देशातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा 40 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. केरळशिवाय दिल्लीमध्येही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायाला मिळाली होती. ए

कूण कोरोना रुग्णांच्या 70 टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातील आहेत. इतर राज्याच्या तुलनेत मागील दोन महिन्यातील केरळमध्ये आढळलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. 27 मे रोजी तामिळनाडूध्ये 24 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. मागील दोन महिन्यापासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत होती. दुसरी लाट ओसरल्याचं तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.

केरळ राज्याने देशाची चिंता वाढवली आहे. देशाच्या 56 टक्के रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले आहेत. केरळचा पॉझिटिव्हिटी रेट 11.18 टक्के इतका झाला आहे. गेल्या मंगळवारच्या तुलनेत या मंगळवारी देशाची रुग्णसंख्या घटली आहे.मात्र, केरळमधील रुग्णसंख्या वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT