Kuniyil Kailashnathan 
देश

गुजरातने चार मुख्यमंत्री पाहिले, पण CMO मध्ये एक IAS अधिकारी कायम होता; कोण आहेत 'केके'?

Kuniyil Kailashnathan Retired: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यातील सर्वात आवडीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा कार्यकाळ तब्बल अकरा वेळा वाढवण्यात आला होता.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गुजरातमधील माजी आयएएस अधिकारी के कैलाशनाथन (Kuniyil Kailashnathan ) हे अखेर सेवानिवृत्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यातील सर्वात आवडीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा कार्यकाळ तब्बल अकरा वेळा वाढवण्यात आला होता. यावरून गुजरात सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यासाठी ते किती महत्त्वाचे होते हे लक्षात येईल.

३० जून रोजी त्यांची सेवानिवृत्ती होती. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी के कैलाशनाथन यांचा योग्य सन्मान करत त्यांना निरोप दिला. कैलाशनाथन हे गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातमधील एक शक्तीशाली अधिकारी म्हणून काम करत होते. पंतप्रधान मोदी यांचे ते खास होते.

२०२३ मध्येच ते अतिरिक्त प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून निवृत्त होणार होते, पण, त्यांचा कार्यकाळ तब्बल ११ वेळा वाढवण्यात आला. सध्या ते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चीफ प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून काम करत होते. ३३ वर्षांपर्यंत त्यांनी गुजरात कॅडरचा अधिकारी म्हणून काम केलं. २१ मार्च २०२३ मध्ये ते निवृत्त झाले होते.

के कैलाशनाथन यांनी आतापर्यंत गुजरातच्या चार मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. यात नरेंद्र मोदी, आनंदीबेन पटेल , विजय रुपाणी आणि भूपेंद्र पटेल यांचा यात समावेश होतो. मुख्यमंत्री कार्यालयात ते महत्त्वाचं काम करत होते.

भूपेंद्र पटेल यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, २००६ पासून कैलाशनाथन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून काम केलं. ते अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. दशकभरापेक्षा अधिक काळ त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून काम केलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर कैलाशनाथन यांनी निवृत होणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्याप्रमाणे ते निवृत्त झाले आहेत. सरकारनेही यासाठी परवानगी दिली आहे. मोदींचे विश्वासू असल्याने त्यांना दिल्लीमध्ये महत्त्वाचे पद दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा कैलाशनाथन यांना राज्यातील राजकीय वर्तुळात सुपर सीएम म्हटलं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT