iit director 
देश

लोकांनी मांस खाल्ल्याने हिमाचलमध्ये भूस्खलनाच्या घटना; IITच्या संचालकांचे अजब विधान

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशातील मंडी येथे असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. तसेच मांस खाल्ल्यानेच राज्यात दरड कोसळण्याच्या आणि ढगफुटीच्या घटना घडत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या अजब वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना बेहरा म्हणाले, “जर आपण असेच करत राहिलो तर हिमाचल प्रदेशची आणखी हानी होईल. तुम्ही इथे निष्पाप प्राण्यांची हत्या करत आहात. प्राण्यांचा पर्यावरणाच्या ऱ्हासाशीही संबंध आहे. तुम्हाला ते सध्या दिसत नाही, पण हे सत्य आहे.

बेहरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "वारंवार भूस्खलन, ढगफुटी आणि इतर अनेक गोष्टी घडत आहेत, हे सर्व प्राण्यांवरील क्रूरतेचा परिणाम आहे. 'चांगली व्यक्ती होण्यासाठी काय करावे? तर त्यासाठी मांस खाणे बंद करावे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले.

काही नेटकऱ्यांनी बेहरा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तर या वादावर बेहरा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT