Lepord Attack News sakal
देश

Leopard Attack News: मुलगी जंगलात पालकांसोबत चालत असताना अचानक गायब झाली, अखेर...

Leopard Attack News : भगवान नरसिंह स्वामी मंदिराजवळील झुडपामध्ये तिचा मृतदेह आढळून आला

सकाळ डिजिटल टीम

Leopard Attack News : आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. एका सहा वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

अधिक माहिती अशी की, ही मुलगी शुक्रवारी रात्री बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू होता. बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव लक्षिता होते. शनिवारी पहाटे भगवान नरसिंह स्वामी मंदिराजवळील झुडपामध्ये तिचा मृतदेह आढळून आला

निर्मला तिरुपती देवस्थानचे विभागीय वन अधिकारी सतीश रेड्डी यांनी सांगितले की लक्षिता वर एखाद्या वन्य प्राण्याने हल्ला केला असावा. तो बिबट्या किंवा अस्वल असू शकतो तिच्या शरीरावर खोल जखमा झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

आम्ही सर्व भाविकांना आवाहन करतो की, त्यांनी एकांतात मार्गक्रमण करू नये तर समूहाने करावे. भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरापर्यंतचा भाग सात मैलांचा असून हा भाग आम्ही हाय अलर्ट घेऊन म्हणून घोषित केला आहे. आम्ही या भागात सुरक्षा वाढवू याचबरोबर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची शिफारस देखील करू असे यावेळी रेड्डी म्हणाले.

पोस्टमार्टम केल्यानंतर लक्षितावर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. . यावेळी डोंगरावरील जंगलात परत जाण्यापूर्वी शरीराचे काही भाग बिबट्याने खाल्ले असल्याचे देखील पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.

ही मुलगी आपल्या पालकांसोबत चालली होती. तिचे पालक पुढे तर ती मागे होती. ती अचानक गायब झाली. अखेर त्याच्या पालकांनी याची तक्रार दक्षता आणि सुरक्षा शाखेला नोंदवली. लगेच पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात धाव घेत शोध मोहीम हाती घेतली. मात्र पहाटे मंदिराजवळ तिचा मृतदेह आढळून आला. तर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तिला तातडीने त्यांच्या गावी नेण्यात आले आहे. असे एका अधिकाऱ्याने सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT