देश

दिल्लीत लॉकडाउन अधिक कडक करा; उच्च न्यायालयात याचिका

पीटीआय

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचे वाढते रुग्ण पाहता लॉकडाउनची अंमलबजावणी कठोरतेने करावी आणि तसे निर्देश सरकारला द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. 

जनहित याचिका दिल्लीतील वकील अर्निबन मोंडाल आणि त्यांचे कर्मचारी पवन कुमार यांनी दाखल केली आहे. जूनच्या अखेरपर्यंत राजधानीत सुमारे एक लाख कोविड-१० चे रुग्ण असतील. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही संख्या २.२५ लाखांवर, तर जुलैच्या शेवटपर्यंत रुग्णांचा आकडा ५.५ लाखांपर्यंत पोचेल, अशी दिल्ली सरकारने भीती व्यक्त केली आहे. अशा स्थितीत सरकारने लॉकडाउनचे कडक पालन करण्याबाबत विचार करायला हवा. ॲड. मृदुल चक्रवर्ती यांच्यामार्फत दाखल याचिकेत म्हटले की, राजधानीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करावी आणि त्यासाठी डॉक्टर, तज्ज्ञ आणि व्हायरोलॉजिस्ट यांची विशेष समिती नेमण्याबाबत दिल्ली सरकारला आदेश द्यावेत.

पहिल्या लॉकडाउनच्या काळात रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे आताही लॉकडाउनचे पालन कठोरतेने करायला हवे, असेही याचिकेत म्हटले आहे. सार्वजनिक परिवहन, धार्मिक स्थळ, मॉल, रेस्टॉरंट, सुरू केल्याने नागरिकांची रस्त्यावर गर्दी वाढू लागली आहे. परिणामी, संसर्ग पसरत असून, कोविड-१९ च्या रुग्णात भर पडत आहे. याशिवाय कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी दिल्लीत पुरेशा प्रमाणात खाटा, अतिदक्षता विभाग, चाचणीची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्यास स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अशा वेळी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडू शकते, असेही याचिकेत म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT