BJP Candidate List 2024  esakal
देश

BJP Candidate List 2024 : भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर 'या' नेत्याची निवडणूक लढणार नसल्याची घोषणा; काय आहे कारण?

Loksabha Election 2024 : भोजपुरी गायक आणि भाजप उमेदवार पवन सिंह यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात नकार दिलेला आहे. पवन सिंह यांनी स्वतः ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

संतोष कानडे

Loksabha Election 2024 : भोजपुरी गायक आणि भाजप उमेदवार पवन सिंह यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात नकार दिलेला आहे. पवन सिंह यांनी स्वतः ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

भाजप उमेदवार पवन सिंह यांनी ट्वट करुन सांगितलं की, भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे मी मनापासून आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून आसनसोल लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. परंतु कारण कारणांमुळे मी आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवू शकत नाही.

शनिवारी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये पवन सिंह यांच्याही नावाचा समावेश होता. पवन सिंह यांच्याशिवाय भोजपुरी इंडस्ट्रीमधून दिनेश लाल यादव, रवी किशन आणि मनोज तिवारी यांचंही भाजपच्या यादीमध्ये नाव आहे. 'न्यूज १८ हिंदी'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, ज्या मतदारसंघांची देशभर चर्चा आहे तिथे भाजपने उमेदवार घोषित केलेले नाहीत. यामध्ये वरुण गांधींचा पीलीभीत मतदारसंघ, मेनका गांधींचा सुल्तानपूर मतदारसंघ, बृजभूषण शरण सिंह यांचा केसरगंज, स्वामी प्रसाद मौर्य यांची मुलगी संघमित्रा मौर्य यांचा बंदायू आणि जनरल व्हीके सिंह यांचा गाझियाबाद मतदारसंघ; या जागांवर भाजपने सस्पेन्स कायम ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT