Amit Shah esakal
देश

Lok Sabha Election 2024 : ''पाच टप्प्यांमध्ये आम्ही 300 पार पोहोचलो'', अमित शाहांचा दावा; काँग्रेसच्या जागांचाही अंदाज सांगितला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना अमित शाह म्हणाले की, राहुल बाबा ४० जागांच्या खाली जात आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये आमच्या तीन विधासभा उमेदवारांना विजयी करा म्हणजे इथेही भाजपचं सरकार स्थापन होईल.

संतोष कानडे

Amit Shah News : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह हिमाचल प्रदेशातल्या ऊना येथे दाखल झाले होते. जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाहांनी पाच टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीचा अंदाज बांधला.

अमित शाह म्हणाले की, पाच टप्प्यांमध्ये मोदीजी ३१० पार झाले आहेत. सहाव्या आणि सातव्या टप्प्यात ४०० पार करुन मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. सातव्या टप्प्यातील मतदारांवर ४०० पारची जबाबदारी आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना अमित शाह म्हणाले की, राहुल बाबा ४० जागांच्या खाली जात आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये आमच्या तीन विधासभा उमेदवारांना विजयी करा म्हणजे इथेही भाजपचं सरकार स्थापन होईल.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, राहुल बाबा आणि त्यांची बहीण शिमल्यात सुट्टीसाठी येतात. परंतु आपल्या वोट बँकेच्या भीतीमुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आले नाहीत. त्यांची वोट बँक रोहिंग्या घुसखोर आहेत. त्यांच्याच भीतीमुळे ते राम मंदिराच्या कार्यक्रमाला आले नाहीत.

अमित शाह पुढे म्हणाले, या निवडणुकीत एका बाजूला ६ महिने सुट्टी घालवणारे राहुबाबा आहेत तर दुसऱ्या बाजूला २३ वर्षांपासून दिपावलीची सुट्टी सेनेच्या जवानांसोबत घालवणारे मोदीजी आहेत. इंडी आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारदेखील नाहीये. एका पत्रकाराने पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत विचारलं असता त्यांनी प्रत्येक वर्षी नवीन पंतप्रधान बनेल, असं सांगितल्याचं अमित शाह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT