Loksabha Election 2024 sakal
देश

Loksabha Election 2024 : देशातील ५४३ मतदारसंघात एकूण एवढ्या उमेदवारांनी गमावली अनामत रक्कम

निवडणूक म्हटलं की हारजित आलीच. चुरशीच्या लढतीत विजयी उमेदवार अगदी काठावर जिंकतो, काहींवर तर पराभवाबरोबरच अनामत रक्कमही गमावण्याची नामुष्की येते.

सकाळ वृत्तसेवा

निवडणूक म्हटलं की हारजित आलीच. चुरशीच्या लढतीत विजयी उमेदवार अगदी काठावर जिंकतो, काहींवर तर पराभवाबरोबरच अनामत रक्कमही गमावण्याची नामुष्की येते. आयोगाच्या माहितीनुसार, देशातील ५४३ मतदारसंघात एकूण ८३६० उमेदवार मैदानात होते आणि त्यापैकी ७१९३ (८६.१७ टक्के) उमेदवारांनी अनामत रक्कम गमावली आहे.

एखाद्या विधानसभा मतदारसंघात दोन लाख मतदान होत असेल तर उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचविण्यासाठी किमान एकूण मतदानाच्या एक शष्टमांश म्हणजेच ३३,३३२ मते मिळणे आवश्‍यक आहे.

पहिल्या लोकसभेत १९५१-५२ च्या निवडणुकीत ४० टक्के उमेदवारांनी आपली अनामत रक्कम गमावली होती. तसेच २०१९ च्या निवडणुकीत ८६ टक्के उमेदवारांनी अनामत रक्कमेवर पाणी सोडले होते, असे निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे.

  • २५ हजार रुपये - लोकसभेसाठी अनामत रक्कम

  • १० हजार रुपये - विधानसभेसाठी अनामत रक्कम

  • १२,५०० रुपये - अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

Latest Marathi News Update: ‘मकोका’तील फरार आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

SCROLL FOR NEXT