Rahul Gandhi sakal
देश

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधी तयार?

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेस नेते राहुल गांधी स्वीकारणार की नाही याबाबत जोरदार तर्कवितर्क सुरू.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेस नेते राहुल गांधी स्वीकारणार की नाही याबाबत जोरदार तर्कवितर्क सुरू असताना काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी या पदासाठी तयार झाल्याचे समजते. संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेमध्ये राहुल गांधींनी आज पहिल्या बाकावर विरोधी पक्षनेत्यांच्या स्थानावर बसून हे संकेत दिल्याचाही दावा काँग्रेस सूत्रांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने पहिल्या दिवसापासूनच सरकारविरुद्ध आक्रमक आघाडी उघडली असून काँग्रेस नेते राहुल गांधी या आघाडीचे नेतृत्व करत आहेत.

आता लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून त्यांनी सरकारला घेरावे असा आग्रह काँग्रेसमधून आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्येही हा मुद्दा चर्चेत आला होता.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविण्याची रणनीती आखण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते झाल्यास राहुल यांना लोकसभेत बोलण्याची अधिक संधी मिळेल व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने स्थान मिळेल, असा काँग्रेसचा होरा आहे.

सरकार आणि विरोधकांमधील चर्चेत थेट सहभागी होऊन राहुल गांधी पंतप्रधान मोदींना थेट लक्ष्य करतील. त्याचप्रमाणे सरकारमधील महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांमध्ये देखील विरोधी पक्षनेत्यांना असलेले कायदेशीर स्थान पाहता, या पदाचा राहुल गांधी पुरेपुर उपयोग करतील असाही दावा या सूत्रांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT