election
election sakal
देश

मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; पंचायत निवडणुका रद्द

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ: मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एक मोठा निर्णय समोर आला आहे. राज्यातील पंचायत निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील शिवराज सिंह सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज रविवारी मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीमध्ये पंचायत निवडणुका (panchayat elections) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास पंचायत निवडणुकीसाठीचा अध्यादेश काढला जाणार आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जातंय.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा या निर्णयाबाबत बोलताना म्हणाले की, राज्यामध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. अशा परिस्थितीत पंचायत निवडणुका घेणं योग्य ठरणार नाही. यापूर्वीही निवडणुका जीवापेक्षा जास्त महत्त्वाच्या नसतात त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजे असल्याचं विधान त्यांनी केलं होतं.

राज्यातील पंचायत निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचायत निवडणुका तीन टप्प्यात प्रस्तावित होत्या. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, पहिल्या टप्प्यासाठी पुढील वर्षी 6 जानेवारीला मतदान होणार होतं. त्यानंतर 28 जानेवारी आणि 16 फेब्रुवारीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार होते. राज्यातील 22 हजार 695 ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकीत सुमारे 71 हजार 389 मतदान केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT