Five labour died in the boiler of a cherry factory 
देश

MP Gas Leakage: फूड फॅक्टरीमध्ये विषारी वायू गळती; तीन संख्या भावांसह 5 जणांचा मृत्यू

कार्तिक पुजारी

Madhya Pradesh Five labourers died in the boiler of a cherry factory

भोपाळ- मध्य प्रदेशाच्या मुरेनामध्ये साक्षी फूड फॅक्टरीमध्ये विषारी वायू गळती झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. फूड फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. माहितीनुसार, पाच मृत कर्मचाऱ्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच फॅक्टरी बंद करण्यात आली आहे.

माहितीनुसार, जिल्ह्यातील जरेरुआ भागातील साक्षी फूड फॅक्टरीमध्ये ही घटना घडली आहे. दोन कामगार ९ फूट खोल टँक साफ करण्यासाठी त्यात उतरले होते. टँकमध्ये असलेल्या विषारी वायुमुळे त्यांना अस्वस्थता जाणवू लागली. त्यांना वरती काढण्यासाठी एकानंतर एक असे तीन कामगार टँकमध्ये उतरले. सर्वच्या सर्व पाच कामगारांचा टँकमध्ये मृत्यू झाला.त्यात तिघेजण सख्ये भाऊ होते असं कळतंय.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली. कामगारांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. साक्षी फूट फॅक्टरीमध्ये चेरी बनवण्याचे काम चालते असं सांगण्यात आलंय.

मुरेनाचे एसपी शैलेद्र चौहान यांनी सांगितलं की, 'मुरेनाच्या एका चेरी फूड फॅक्टरीमध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत.' वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT