water crisis Sakal
देश

पाणीटंचाईचा महाराष्ट्र सदनालाही फटका; केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या महाराष्ट्रातील खासदारालाही बसली झळ

सायंकाळपर्यंत महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा पूर्ववत झाला असला तरी या प्रकारामुळे सदनाच्या व्यवस्थापनातील विस्कळितपणाही उघड झाला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली :राजधानी दिल्लीमध्ये भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईचा फटका महाराष्ट्र सदनालाही बसला. कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन मध्ये आलेल्या अतिथींचे पाण्याअभावी आज चांगलेच हाल झाले. विशेष म्हणजे केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या महाराष्ट्रातील एका नवनिर्वाचित खासदारालाही पाणीटंचाईची झळ बसली.

त्यामुळे मंत्री महोदयांच्या स्नानासाठी महाराष्ट्र सदन व्यवस्थापनाला बाहेरून पाण्याची व्यवस्था करावी लागली. सायंकाळपर्यंत महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा पूर्ववत झाला असला तरी या प्रकारामुळे सदनाच्या व्यवस्थापनातील विस्कळितपणाही उघड झाला.

या सदनात प्रधान सचिव दर्जाचे आयुक्त, सहआयुक्त, दोन साहाय्यक आयुक्त आणि व्यवस्थापक यांचीही कार्यालये असताना दिवसभर पाणी उपलब्ध नसण्याची नामुष्की महाराष्ट्र सदनावर ओढवली.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील उन्हाळ्यामुळे वातानुकूलित यंत्रणेसाठी भरपूर पाणी लागते. पाणी नसल्यास टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते. मात्र ही बाब लक्षात न आल्याने सदनातील अतिथींसह केंद्रातील मंत्र्यांनाही पाणीटंचाईचा फटका बसला.

येथे सकाळपासून दुपारी तीन पर्यंत पाणी नव्हते. त्याचप्रमाणे ईदच्या शासकीय सुट्टीमुळे सरकारी अधिकारीही सदनात उपस्थित नव्हते. प्रत्यक्ष मंत्रिमहोदयांचीच मोठी गैरसोय झाल्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली आणि सायंकाळी पाच पर्यंत पाणी आले.

पुरेसे मनुष्यबळच नाही

नवीन महाराष्ट्र सदनातील अंतर्गत व्यवस्था हाताळण्याची जबाबदारी असलेल्या खासगी कंपनीच्या कंत्राटाची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनाची देखरेख करण्यासाठी देखील पुरेसे मनुष्यबळ नेमण्यात आले नसल्याचेही समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT