mamata banerjee narendra modi 
देश

मोदींच्या बैठकीत उशीरा येऊन ममता म्हणाल्या, 'इतरही बैठका आहेत, निघते'

विनायक होगाडे

कोलकाता : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यास चक्रीवादळामुळे ओडीसा आणि बंगालमध्ये झालेल्या नुकसानीसंदर्भातील आढावा घेत आहे. ते या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सुवेंदु अधिकारी यांना देखील निमंत्रण दिलं गेलं आहे, ज्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी जाहीर केली आहे. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील नुकसानीचा आढावा घेतला आहे. मात्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांनी वेगवेगळे हवाई सर्वेक्षण केले आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीत सामील होणार नाहीयेत. त्यांच्या या कृत्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारमधील अंतर अधिक वाढण्याच्या शक्यता आहेत. यास चक्रीवादळासंदर्भात पंतप्रधान मोदींच्या या आढावा बैठकीत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, ममता बॅनर्जी, केंद्री मंत्री देवाश्री चौधरी आणि धर्मेंद्र प्रधान देखील सामील होणार आहेत. याशिवाय विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी देखील सामील होणार आहेत, मात्र ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत यायला अर्धा तास उशीर केला. आल्यानंतर त्यांनी चक्रीवादळाच्या नुकसानीसंदर्भातील कागदपत्रे बैठकीत सादर केली, इतर नियोजित बैठका असल्याचं सांगत त्या निघून गेल्या, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. थोडक्यात, ममता बॅनर्जी यांनी बैठकीत येण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

घटस्फोट पाहिले, नाती तुटताना पाहिली... लग्नाआधीच ऋषी सक्सेनासोबत लिव्ह-इनमध्ये का राहते ईशा केसकर? स्वतः सांगितलं कारण

MPSC Exam Update: एमपीएससी ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना; अधिकृत निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT