Animal Viral Video, kangaroo Viral Video, Viral animal video esakal
देश

Viral Video : अचानक रस्त्यावरील व्यक्तीला दिसला कांगारू, भारतात आलं तरी कुठून?

याचा एक व्हिडिओ ट्विटरवर समोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

याचा एक व्हिडिओ ट्विटरवर समोर आला आहे.

पश्चिम बंगालच्या (West Bengal) जलपाईगुडी (Jalpaiguri) जिल्ह्यातील रस्त्यावर कांगारू (kangaroo) फिरताना काही लोकांना दिसले. याचा एक व्हिडिओ (Viral Video) ट्विटरवर समोर आला आहे. कांगारू ऑस्ट्रेलिया, टास्मानिया आणि न्यू गिनी वगळता जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत, त्यामुळे भारतातील रस्त्यांवर त्यांना पाहून अनेक लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीच्या रस्त्यांवर फिरणारे कांगारूंचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (kangaroo viral Video)

फोटो आणि व्हिडिओंमुळे लोकांना आश्चर्य वाटत आहे की ते कांगारु भारतात कुठून आले आहेत. हे प्राणी प्राणिसंग्रहालयातून पळून गेले असावेत, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला, तर काहींनी त्यांची तस्करी होत असावी, असा दावा केला.

दरम्यान आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवरून प्राण्यांची तस्करी होत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, "ते (कांगारू) या भागातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात उपस्थित नाहीत. ते तस्करीचा भाग आहेत. मात्र, नंतर ते जप्त करण्यात आले. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे. गेल्या महिन्यात दोन जणांना कांगारूसह अटक करण्यात आली होती."

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जलपाईगुडी आणि सिलिगुडी येथून तीन कांगारूंची सुटका केली. अधिकाऱ्यांना सिलिगुडीजवळ एका छोट्या कांगारूचा मृतदेहही सापडला. बैकुंठपूर वन विभागांतर्गत बेलकोबा वनपरिक्षेत्राचे रेंजर संजय दत्ता म्हणाले, 'कांगारूंच्या शरीरावर काही गंभीर जखमा झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी बंगाल सफारी पार्क येथे पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे."

ही बाब लक्षात आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबात काय म्हटले?

रेंजर संजय दत्ता म्हणाले, "या कांगारूंचा ठावठिकाणा, त्यांना जंगलात कोणी आणि कसे आणले, तसेच त्यांना आणण्यामागील कारण शोधण्यासाठी आम्ही पुढील तपास सुरू केला आहे." याचाही शोध घेतला जाईल,' असे आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, 'सुटका झाल्यानंतर या तिन्ही कांगारूंना उपचारासाठी पाठवण्यात आले. या कांगारूंना येथे कोणी आणि कसे आणले याचे आम्हाला आश्चर्य वाटते. या कांगारूंची नेपाळमध्ये तस्करी होत असल्याचा आम्हाला संशय आहे. पण तस्करी करण्यामागचा हेतू काय आहे, याचाही आम्ही तपास करत आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT