Mansukh Mandviya esakal
देश

मुलांचे लसीकरण वाढवा, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या राज्यांना सूचना

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज देशातील राज्य आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. राज्यांनी शाळेत जाणाऱ्या मुलांना कोरोना (Corona) प्रतिबंधात्मक लस देण्यावर लक्ष द्यावे. तसेच कोरोनाचा बूस्टर डोस ज्येष्ठांना मिळेल याकडे लक्ष द्यावे, असा सूचना आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी राज्यांना केल्या. (Mansukh Mandaviya Urged States To Increase Corona Vaccination Of School Going Children)

जिनोम सिक्वेन्सिंग बळकट करण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. आजपासून देशातील शाळा सुरु झाल्या आहेत. त्यातच देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या ४० हजारांपुढे गेली आहे. महाराष्ट्रात रविवारी २,९४६ रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला. यात मुंबईत सर्वात अधिक १, ८०३ रुग्णांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला राज्यात १६ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे १ हजार ४३२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

त्यामुळे शाळकरी मुलांचे कोरोना लसीकरण वाढवण्याची सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी राज्यांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; १० किलो वजन घटवलं, नवा लूक पाहून चाहते शॉक

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Chinchwad Electricity ट्रान्सफर्मरला आग, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित; आगीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT