Rahul Gandhi 
देश

राहुल आजकाल केवळ त्रागाच करतात : प्रसाद 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : 'संघाला सत्ता आल्यावरच तिरंगा झेंड्याची आठवण आली,' या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेने घायाळ झालेल्या भाजपने, पुन्हा आणीबाणी उकरून काढतानाच, सध्या देशाच्या सत्तर टक्के भूभागावर भाजपची सत्ता आहे. हे न कळणाऱ्या राहुल गांधी यांची आम्हास दया येते, असा प्रतिहल्ला चढविला आहे. राहुल आजकाल भाषण करत नाहीत; केवळ आक्रस्ताळेपणाने त्रागा करतात, असा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.

विरोधकांचा आजचा मेळावा हा (मोदींच्या लोकप्रियतेला घाबरलेल्या) हरलेल्या लोकांचा हा जमाव होता. पराभव हाच त्यांचा सामायिक वारसा (सांझी विरासत) होता असेही टीकास्त्र त्यांनी सोडले. 

संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते शरद यादव यांच्यावर टीका करताना प्रसाद म्हणाले, की जयप्रकाश यांच्या चरणाशी बसून कॉंग्रेस विरोधानेच आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे यादव आज राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे पहाणे क्‍लेशकारक आहे. राहुल यांनी संघावरच नेम धरल्याने प्रसाद यांनी, संघाचे विचार देशवासीयांना मान्य असल्याचा दावा केला.

ते म्हणाले, की राहुल आजकाल भाषण देण्याऐवजी फक्त चिडचिड करतात. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणीत देशाची मुस्कटदाबी करताना, 'एकनिष्ठ न्यायसंस्था' असे सूत्र मांडले होते. या स्थितीत राहुल यांना संघाबाबत अशी विधाने करणे शोभा देणारे नाही. आजच्या मेळाव्याला डावे पक्षही होते. त्याबाबत प्रसाद म्हणाले, की मध्य प्रदेश व पश्‍चिम बंगालमध्ये नुकत्याच काही पालिकांच्या निवडणुका झाल्या. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस पहिल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या डाव्यांचा काही पत्ताच नाही ते कोठे गेले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT