Mizoram sakal
देश

Mizoram Vidhan Parishad Election : ‘एसईडीपी’ सुरू ठेवणार - तवनलुइया

ऐजॉल येथे माध्यमांशी बोलताना तवनलुइया म्हणाले, ‘एसईडीपी हे धोरण मतपेट्यांसाठी राबविले जात नसून ही, मिझोराममधील विकासाभिमुख लोककल्याणकारी उपक्रम आहे.’

पीटीआय

ऐजॉल - राज्यात पुन्हा ‘मिझो नॅशनल फ्रंट’चे(एमएनएफ) सरकार आल्यास राज्य सरकारची सामाजिक-आर्थिक विकास धोरण(एसईडीपी) सुरू ठेवण्यात येईल असे आश्‍वासन मिझोरामचे उपमुख्यमंत्री आणि ‘एमएनएफ’चे उपाध्यक्ष तवनलुइया यांनी गुरुवारी मिझोराममधील नागरिकांना दिले.

ऐजॉल येथे माध्यमांशी बोलताना तवनलुइया म्हणाले, ‘एसईडीपी हे धोरण मतपेट्यांसाठी राबविले जात नसून ही, मिझोराममधील विकासाभिमुख लोककल्याणकारी उपक्रम आहे.’ या धोरणाच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत राज्यातील हजारो लाभार्थींना सुमारे ४५० कोटी निधी देण्यात आला असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.

मिझोराममध्ये विधान परिषदेच्या एकूण ४० जागा असून येथे सात नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. येथील सत्ताधारी एमएनएफ आणि विरोधी पक्षातील झोराम पीपल्स मूव्हमेंट(झेडपीएम) त्याच प्रमाणे काँग्रेस आणि भाजप हे पक्ष येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहेत.

‘झेडपीएम’ आणि ‘एमएनएफ’ या पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र काँग्रेस आणि भाजपने अद्यापही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. दरम्यान, आम आदमी पक्ष देखील मिझोराम येथे उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता असून पुढील आठवड्यात ‘आप’कडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

‘एसईडीपी’चे फायदे

मिझोराममध्ये सामाजिक-आर्थिक विकास धोरण अर्थात एसईडीपीच्या माध्यमातून येथील नागरिकांना शाश्‍वत विकासावर आधारलेले उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सरकारकडून तीन लाखांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

Central Railway: सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी, उतारावर नियंत्रण सुटलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT