Rahul Gandhi and PM Narendra Modi टिम ई सकाळ
देश

हा तर देशद्रोह, पेगसस प्रकरणावर राहुल गांधींचा मोदींवर आरोप

"मोदी सरकारने हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली"

सकाळ डिजिटल टीम

पेगासस (Pegasus) डीलबाबत न्यूयॉर्क टाइम्सने एक धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जुलै २०१७ मध्ये इस्रायल दौऱ्यावर गेले होते तेव्हा इस्रायलसोबत २ अब्ज डॉलरचे संरक्षण विषयक डील झाले होते. त्यात मिसाइल सीस्टम व्यतिरिक्त इस्रायली कंपनी एनएसओने बनवलेल्या पेगासस स्पायवेअर याचाही समावेश होता, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात सांगण्यात आले आहे यावर देशात आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर ताशेरे ओढले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट द्वारे मोदी सरकारवर हल्ला केला. "मोदी सरकारने हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली. यात राजकीय नेते, सामान्य नागरिक, लोकशाहीचा आधार असलेल्या संस्था या सर्वांचीच हेरगिरी करण्यात आली. फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लष्कर, न्यायपालिका यांना लक्ष्य करण्यात आलं. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे" असा आरोप राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT