Al Qaeda terrorist organization esakal
देश

देशात मोठ्या आत्मघाती हल्ल्याची शक्यता; 'अल कायदा'ची भारताला थेट धमकी

सकाळ डिजिटल टीम

अल कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिलीय.

नवी दिल्ली : अल कायदा (Al Qaeda) या दहशतवादी संघटनेनं भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिलीय. अल कायदानं 6 जून रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्यास तयार असल्याची धमकी दिलीय. भाजपच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांनी क्षयरोगाच्या चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद (Mohammad Paigambar) यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल अल कायदानं ही धमकी दिलीय.

अल-कायदानं पत्रात म्हटलंय की, प्रेषितांच्या सन्मानाकरिता लढण्यासाठी दिल्ली, मुंबई (Mumbai), उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आम्ही आत्मघाती हल्ले करणार आहोत. काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या प्रचारकानं टीव्हीच्या चर्चेदरम्यान इस्लाम आणि पैंगंबर मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळं जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या मुलांच्या शरीराला स्फोटके बांधू जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल. तसेच पैगंबर मोहम्मद यांच्या गुन्हेगारांना आम्ही माफ करणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

Al Qaeda terrorist organization

पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं भारतीय जनता पक्षातून (भाजप) हकालपट्टी करण्यात आलेल्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि तिच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सुरक्षा पुरवलीय. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिलीय. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे माजी प्रवक्ते शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या तक्रारींसंदर्भात एफआयआर नोंदवला होता. आपल्याला मिळत असलेल्या धमक्यांचा हवाला देत शर्मा यांनी पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती.

भाजप प्रवक्त्यांच्या वक्तव्यानं 14 देश संतप्त

भारताविरोधात निदर्शनं करणाऱ्या देशांमध्ये इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया, इंडोनेशिया आणि पाकिस्तान (Pakistan) यांचा समावेश आहे. याशिवाय भारतातील भाजप प्रवक्त्यांविरोधात विरोधी पक्ष सातत्यानं नाराजी व्यक्त करत आहेत. शर्मा यांना अटक करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT