Uttar Pradesh Crime Esakal
देश

Uttar Pradesh Crime: आधी २ वर्षाच्या मुलाचा गळा चिरला नंतर जाळले, आईच्या नावाला काळिमा फासणारी घटना

Mother Brutally Killed Child in Uttar Pradesh: आदेश देवी या महिलेने आपल्या निरागस ४ वर्षाच्या हर्षला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की, तिच्या स्वप्नात एक आई आली होती जिने तिला तसे करण्यासाठी सांगितले होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आई आणि मुलाचं नातं हे जगातील सर्वात घट्ट नातं मानलं जातं, मात्र बिजनौरच्या हीमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जलालपूर हसना गावात एका आईने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची एवढ्या दुर्दैवी पद्धतीने हत्या केली. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी आईने सांगितले की, तिची आई तिला स्वप्नात आली होती आणि तिने असे करण्यास सांगितले होते, मात्र डॉक्टर आईला मानसिक तणावाखाली असल्याचे सांगत आहेत.

अमर उजाला या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आदेश देवी या महिलेने आपल्या निरागस मुलाला हर्षला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की, तिच्या स्वप्नात आई आली होती जिने तिला तसे करण्यास सांगितले. ही संपूर्ण घटना घरात फक्त महिला आणि तिचे मूल असताना घडले आहे. तिचा नवरा शेतात गेला होता आणि आजी-आजोबाही बाहेर होते.

प्रथम महिलेने मुलाच्या मानेवर फावडे मारले, त्याच्या मानेवर वर्तुळाकार जखमा होत्या, त्यानंतर तिने त्याला तव्यावर ठेवून चटके देण्याचा प्रयत्न केला. नंतर तिने मुलाला बाहेर ठेवलेल्या लाकडात पेटवून दिले. पतीने घरी येऊन मुलाची विचारपूस केली असता महिला काहीच बोलली नाही मात्र जळत्या लाकडांजवळ मूल पडलेले पाहून पतीला धक्काच बसला. मुलाला तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

महिला मानसिक रूग्ण असून तिच्यावर उपचार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या भावाने सांगितले की, ती मानसिक रुग्ण आहे आणि तिच्यावर एक वर्षाहून अधिक काळ उपचार सुरू होते. मात्र, तिच्या पतीच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी सकाळपासून ती बरी होती आणि तिने जेवणही बनवले होते. पण असे अचानक काय झाले याचा कोणालाच अंदाज येत नाही. सध्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT