MP Assembly Election 
देश

MP Assambly Election: सवाई माधोपूरची जागा जिंकण्यासाठी सर्वचं लागले कामाला; 'जात' ठरणार प्रभावी

सकाळ डिजिटल टीम

MP Election: रणथंबोर व्याघ्र अभयारण्याच्या कुशीत पहुडलेल्या सवाई माधोपूर या मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळेल. येथेही जात फॅक्टरच प्रभावी ठरत असून सर्वच पक्षांनी त्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येते.

भाजपचे राज्यसभेचे खासदार किरोडीलाल मीना व काँग्रेसचे विद्यमान आमदार दानिश अबरार यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळेल. या मतदारसंघात मीना, मुस्लिम, गुज्जर समुदायाचे प्रमाण लक्षणीय आहे. भाजपच्या बंडखोर नेत्या आशा मीना यांना यंदा उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत.

मागील निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती पण त्यांचा पराभव झाला होता. अबरार यांनीच त्यांना पराभूत केले होते. पूर्व राजस्थानातील हा सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. येथे याखेपेस तिरंगी लढत पाहायला मिळेल. मागील निवडणुकीत अबरार यांनी २५ हजार मत फरकाने मीना यांच्यावर मात केली होती. तेव्हा अबरार यांना मुस्लिम, गुज्जर आणि अन्य समुदायांची देखील मते मिळाली होती.

मीना समाजाची मते मात्र आशा मीना यांच्या पारड्यात पडली होती. ही निवडणूक अबरार यांच्यासाठी देखील कसोटी ठरणार असून सचिन पायलट गटातून बाहेर पडल्याने त्यांना गुज्जर समाजाची मते मिळण्याची शक्यता कमीच आहे. भाजपचे किरोडीलाल यांनाही मीना समाजाची मते मिळण्याची शक्यता कमीच आहे

भाजप हा भरकटलेला पक्ष : प्रियांका गांधी

राजस्थानमध्ये भाजप पूर्णपणे भरकटला असून त्यांच्या पक्षाला आता मुख्यमंत्रिपदाचा चेहराच नसल्याची टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वद्रा यांनी आज केली. पंतप्रधान मोदींसमोरील पर्याय आता संपले असल्याचे दिसून येते, असा टोलाही त्यांनी लगावला. त्या सागवाडा येथे आयोजित सभेत बोलत होत्या. प्रियांका म्हणाल्या, ‘‘कोणी मते मिळविण्यासाठी जर धार्मिक भावनांचा आधार घेत असेल तर लोकांनी त्यापासून सावध राहायला हवे. वाढती महागाई आणि भ्रष्टाचारामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.’’

भाजपचा जाहीरनामा निरर्थक : गेहलोत

जयपूर ः भाजपच्या जाहीरनाम्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला असून त्यामध्ये काहीही अर्थच नसल्याची टीका मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज केली. ‘‘भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी पुरेसा गृहपाठच केल्याचे दिसून येत नाही कारण आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी केलेल्या घोषणांचा याआधीच समावेश करण्यात आला होता. आमच्याच जाहीरनाम्यामध्ये हेराफेरी करून तोच भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे,’’ असे गेहलोत यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT