MP Election 2023 
देश

MP Election 2023: उमेदवारांना निवडणुकीत खर्च करता येणार 'एवढी' रक्कम! नियम न पाळल्यास ठरणार अपात्र

Sandip Kapde

MP Election 2023: मध्य प्रदेश निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान निवडणुकीतील उमेदवारांसाठी खर्चाची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना एकूण 40 लाख रुपये खर्च करता येणार आहेत. तर उमेदवारांना फक्त 10,000 रुपये 'रोख' खर्च करण्याची परवानगी असेल. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निवडणूक खर्च व खर्चाच्या लेखाजोखाच्या बैठकीत जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी आशिष सिंह यांनी ही माहिती दिली.

उमेदवार जेव्हा उमेदवारी अर्ज सादर करतील, तेव्हा त्यांना निवडणूक अधिकाऱ्याकडून एक रजिस्टर दिले जाईल. यामध्ये उमेदवारांना त्यांचा दैनंदिन खर्च बिलासह मांडावा लागेल.  उमेदवार सर्व खर्चासाठी फक्त 10,000 रुपयांपर्यंत रोख पेमेंट करू शकतात. यावरील खर्च चेक व ऑनलाईन भरावा लागेल. (Latest Marathi News)

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशेब, त्यांच्या खर्चासह हिशेब आणि खाते नोंदवही, बिले व पावत्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर कराव्या लागतील. कोणत्याही उमेदवाराने तसे न केल्यास त्याला तीन वर्षांसाठी विधानसभा, लोकसभा, विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले जाईल आणि त्याला दंडही ठोठावला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार उमेदवाराच्या एकूण खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, त्यावेळी उमेदवाराला 20 हजार रुपये रोख खर्च करण्याची मुभा होती. मात्र, ही मर्यादा केवळ 10 हजार रुपये करण्यात आली आहे. (MP Latest News)

निवडणूक खर्चासाठी उमेदवाराला स्वतःचे आणि त्याच्या एजंटच्या नावाने नवीन बँक खाते उघडावे लागेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. या खात्यातून सर्व जमा आणि पैसे काढले जातील. त्याचबरोबर उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या रजिस्टरमध्ये  खर्चाची माहिती द्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

प्रेमानंद महाराजांना भेटल्यास ढसाढसा रडली पूनम पांडे, नेटकरी म्हणाले...'आधी सगळं करुन बसली आणि आता..'

Latest Marathi News Live Update : राष्ट्रपती मुर्मूंनी घेतलं गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन

Viral Video: ‘संस्कार’ म्हणजे काय ते दाखवलं! वडिलांचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

SCROLL FOR NEXT