Rahul Gandhi Sakal
देश

मंडी में मंदी क्यों? खासदारकी परत मिळण्याच्या पूर्वसंध्येला Rahul Gandhi मार्केट यार्डात; जाणून घेतल्या समस्या

राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवरून शेअर केला आहे.

दत्ता लवांडे

दिल्ली : राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांना त्यांची गेलेली खासदारकी पुन्हा मिळाली आहे. लोकसभा सचिवालयाकडून त्यांना आता खासदारकी बहाल करण्यात आली असून उद्या मोदी आणि राहुल गांधी आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यांनी याआधी मार्केट यार्डमध्ये जाऊन कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते आझादपूर येथील मार्केट यार्डमध्ये गेले असून व्यापारी, मजूर, कामगार, शेतकऱ्यांची भेट घेतली.

"जटाशंकर हे येथे काम करणारे मजूर असून, या कामामुळे त्यांना एक वर्षापासून घरी जाता येत नाही. गेलात तरी काम चुकले तर पैसे कापले जातील आणि या महागाईत जगणे कठीण होऊन बसेल, त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाला भेटता आलेलं नाही."

"या नुकसानीमुळे आठवड्यातून दोन ते तीन दिवस उपाशी झोपावे लागते" असेही एका दुकानदाराने सांगितले. देशातील गरिबांचे प्रश्न सोडवणे तर दूरच, सरकार त्यांचे ऐकूनही घेत नाही!

काळ बदलेल, भारत एक होईल, गरिबांचे अश्रू पुसले जातील."

असं ट्वीट राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून केलं असून यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी याआधी ट्रक ड्रायव्हर, शेतकरी महिला, भात लागवड करणारे शेतकरी यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर हरियाणा येथील काही महिला शेतकरी गांधी कुटुंबियांना त्यांच्या दिल्लीतील घरी येऊन भेटल्या आहेत. त्यानंतर त्यांनी मार्केट यार्डमध्ये जाऊन तिथे काम करणाऱ्या नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. पूर्ण व्हिडिओ राहुल गांधी यांच्या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT