ramesh bidhuri  
देश

'तो मोदींविरुद्ध बोलला म्हणून ..'संसदेत अपशब्द काढल्यानंतर भाजप खासदाराचे सभापतींकडे स्पष्टीकरण

MP Ramesh Budhari:भाजप खासदार रमेश बुधारी आणि खासदार दानिश अली यांच्यात नेमकं काय घडलं होतं, याची माहिती भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सभापती ओम बिर्ला यांना दिली आहे.

Manoj Bhalerao

MP Abuse In Parliament:संसदेत चांद्रयान-३च्या विषयावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे असभ्य शब्द वापरले होते. त्यानंतर या घटनेवर गंभीरतेने सभापतींनी चर्चा केली आणि रमेश बिधुरी यांनी केलेलं वक्यव्य संसदेच्या कामकाजातून हटवण्यात आलं.

या सर्व प्रकरणावर आता तिसऱ्या खासदाराने स्पष्टीकरण दिले आहे. भाजप खासदार रमेश बुधारी आणि खासदार दानिश अली यांच्यात नेमकं काय घडलं होतं, याची माहिती भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सभापती ओम बिर्ला यांना दिली आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शनिवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून गुरुवारी लोकसभेत बसपा खासदार कुंवर दानिश अली आणि भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्यात काय घडलं याची प्रत्येक बारीक गोष्ट सांगितली आहे. त्यांनी पत्र लिहितं ही माहिती दिली. दानिश अली यांनी पंतप्रधान मोदींबद्दल खालच्या पातळीतील शब्द वापरले जे माफीस पात्र नव्हते. आपल्या पत्रात निशिकांत दुबे म्हणाले की, रमेश बुधारी यांच्या गैरवर्तनाचे समर्थन करत नाही, पण त्यांनी हे पाऊल का उचललं याची पार्श्वभूमी सभापतींना माहिती हवी.

मागच्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाकडे मीडियाने लक्ष वेधून घेतलं आहे आणि इतर राजकीय पक्ष त्याचं राजकारण टिकवण्यासाठी याला हवा देत आहे, असे दुबे म्हणाले.(Latest Marathi News)

निशिकांत दुबे म्हणाले की, "श्री दानिश अली यांनी केलेले हे विधान, माझ्या मते, कोणत्याही देशभक्त लोकप्रतिनिधीला 'शांतता गमावण्यासाठी' पुरेसे होते आणि त्यामुळे श्री बिधुरी यांनी त्यांना त्यांच्याप्रमाणेच प्रतिसाद दिला." . निशिकांत दुबे म्हणाले की, दानिश अलीने अशी मोदींविषयी 'लज्जास्पद आणि निंदनीय' टिप्पणी केली तेव्हा मीडियाचे लक्ष त्यांच्या वक्तव्यांकडं गेलं नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT