Muda Scam Case esakal
देश

MUDA Scam : पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्र तयार करून 'मुडा'ची फसवणूक; मुख्यमंत्र्यांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Muda Scam Case : या घोटाळ्यात दिवसेंदिवस नवनवीन नावे ऐकायला मिळत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पत्नी पार्वती, आई मल्लिकार्जुनस्वामी देवराज आणि कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (Mysore City Development Authority Muda Scam) घोटाळ्यासंदर्भात बनावट कागदपत्रे सादर करून भूखंड मिळवल्याच्या आरोपाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah), त्यांची पत्नी पार्वती यांच्यासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घोटाळ्यात दिवसेंदिवस नवनवीन नावे ऐकायला मिळत आहेत. आता म्हैसूर विजयनगर पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्र तयार करून ‘मुडा’ची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती आणि एकूण १० जणांविरुद्ध बनावट कागदपत्रे सादर करून जागा मिळवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पत्नी पार्वती, आई मल्लिकार्जुनस्वामी देवराज आणि कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याच प्रकरणात जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपनिबंधक आणि मुडा अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. स्नेहमाई कृष्णा नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल करून पोलिसांसह राज्यपाल, राज्याचे मुख्य सचिव, महसूल विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहिले आहे. यात तक्रारदाराने अनेक प्रश्न उपस्थित केले असून, या प्रकरणात भूसंपादनात केलेल्या ‘स्टेट डीड’बाबत साशंकता आहे.

मूळ जमीन मालकाचे पुत्र मल्लिकार्जुनस्वामी देवराज यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९९८ मध्ये भूसंपादन सोडण्यात आले, हे खरे असेल तर ‘आरटीसी’मध्ये २०१०पर्यंतच्या भूसंपादनाचा उल्लेख का आहे. तसेच नंतर ही जमीन मल्लिकार्जुनस्वामी देवराजू यांच्या मालकीची व त्यांच्या ताब्यात होती, तर प्राधिकरणाची विकासकामे का थांबवली नाहीत? असे सवाल त्यांनी केले आहे. या घोटाळ्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपनिबंधक आणि मुडा अधिकारी यांचाही सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT