delhi nsg 
देश

मुंबईत हायअलर्ट! दिल्लीत IS दहशतवाद्याला पकडल्यानंतर पोलिस यंत्रणेला सूचना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशाची राजधानी दिल्लीत धौला कुआ भागात शुक्रवारी रात्री पोलिसांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. यामध्ये संशयित दहशतवादी अबू यूसुफला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेला अबू यूसुफ हा IS चा दहशतवादी असून देशातील वेगवेगळ्या भागात घातपाताचा कट कऱण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडून 15 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, सध्या गणेशोत्सव असून महाराष्ट्रात मुंबईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

हायअलर्ट जारी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. सुरक्षा व्यवस्था कडक कऱण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं समजते.

दिल्लीत पकडण्यात आलेल्या यूसुफने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने सांगितलं की, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून देशातील अनेक भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचत आहे. राम मंदिर भूमी पूजनानंतर एका महिन्याच्या आतच हा घातपात करण्याचा कट रचला असल्याचं दहशतवाद्याने म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला माहिती मिळताच शुक्रवारी रात्री करोल बागकडे जाणाऱ्या रिज रोडजवळ अबू यूसुफला ताब्यात घेतलं गेलं. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, ISIS दहशतवादी एका दुचाकीवर होता. त्याच्याकडून प्रेशर कुकरमध्ये IED जप्त केलं असून त्याचं वजन नेमकं किती याची माहिती मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT