rahul gandhi sanjay raut 
देश

'लोकशाहीची हत्या'; विरोधकांचे संसदेबाहेर आंदोलन

कार्तिक पुजारी

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी पावसाळी अधिवेशन अचानक संपवल्याप्रकरणी संसदेच्या इमारतीसमोर आंदोलन केले

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी पावसाळी अधिवेशन अचानक संपवल्याप्रकरणी संसदेच्या इमारतीसमोर आंदोलन केले. महिला खासदारांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांना त्यांचे विचार संसदेत मांडण्याची संधी देण्यात आली नाही. काल महिला खासदारांसोबतची घटना लोकशाही विरोधी होती. पाकिस्तानच्या सीमेवर उभे टाकल्यासारखं आम्हाला वाटत होतं, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. (National Latest News)

राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला. विरोधकांना संसदेत बोलू देण्यात आलं नाही. म्हणून आम्ही माध्यमांसमोर बोलण्यासाठी आलो आहोत. लोकशाहीची हत्या झाली आहे. संसदेचे अधिवेशन संपले आहे. देशातील 60 टक्के लोकांचा आवाज दाबण्यात आला. यांच्यासाठी हे अधिवेशन नव्हते. राज्यसभेत मारहाण करण्यात आली. ही लोकशाहीची हत्या आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत यासाठी विरोधकांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत मार्च काढला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही संसदेतील घटनेवरुन मोदी सरकारवर टीका केली. गेल्या 55 वर्षांच्या कार्यकाळात कधीही महिला खासदारांवर हल्ला झाल्याचं पाहिलं नाही. हे खुप दु:खद आहे. हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असं शरद पवार म्हणाले. जवळपास 40 मार्शल (महिला आणि पुरुष) आणि सुरक्षा दल हल्ल्यासाठी तैनात करण्यात आले होते. काँग्रेसनेही या मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. संसदेत जे घडलं ते अॅट्रोसिटीपेक्षाही भयंकर होतं, असं काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले.

विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा आणि लोकसभा दोन दिवस आधी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास 15 पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात मोर्चा उघडला होता. शेतकऱ्यांचे आंदोलन, पेगॅसस प्रकरण आणि वाढते इंधर दर यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्यात आले. या सर्व मुद्द्यांमुळे संसदेचे कामकाज गोंधळात पार पडले. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ'मधील गैरव्यवहाराची ‘ईडी’कडून चौकशी करा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT