Police Arrest Sakal
देश

Hindu-Muslim : मंदिरात नमाज पढणाऱ्या अकरमला अटक; म्हणाला, "मंदिर अन् मस्जिद माझ्यासाठी एकच"

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील हापूड मधील चंडी या हिंदू मंदिरात एका मुस्लीम तरूणाने नमाज पढल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन समाजामध्ये तणावर पसरला होता. या घटनेनंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत अकरम नावाच्या तरूणाला अटक केली आहे.

आज सकाळी चंडी माता मंदिरात अकरम या मुस्लीम तरूणाने नमाज पढल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांना कळवले असता पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतलं आहे.

अधिक माहितीनुसार, पोलिसांनी अटक केल्यानंतर अकरम या तरूणाने सांगितलं की, "मी आज घरातून निघालो आणि आज मंदिरात नमाज पढू असं माझ्या मनात आलं. कारण माझ्यासाठी मंदिर आणि मस्जीद एकच आहे." तर दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळांवर जाऊन नमाज पढणे चुकीचं असल्याचं मत नागिरकांनी व्यक्त केलं आहे.

तर सदर आरोपीची अधिकची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत असून सदर आरोपी विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT