Names of Amit Shah Kishan Reddy dropped from FIR in Hyderabad marathi news  
देश

Amit Shah News : ...अन् अमित शहांचे नाव ‘एफआयआर’मधून वगळले; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

हैदराबाद येथील लालदरवाजा ते सुधा चित्रपटगृह या दरम्यान एक मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

रोहित कणसे


हैदराबाद : निवडणूक प्रचारादरम्यान, अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा आरोप करत तेलंगणचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी निरंजन यांनी दाखल केलेल्या एफआयआरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तेलंगणचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी या दोघांची नावे वगळ्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

हैदराबाद येथील लालदरवाजा ते सुधा चित्रपटगृह या दरम्यान एक मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहा यांच्यासह काही अल्पवयीन मुलेही होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलांचा वापर प्रचारासाठी करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसने तेलंगणच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने हे प्रकरण पोलिसांकडे तथ्य तपासण्यासाठी वर्ग केले. यानंतर शहर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला. यामध्ये अमित शहा, जी. किशन रेड्डी, माधवी लता, टी.राजासिंह आणि टी. यमनसिंह यांच्या नावाचा समावेश एफआयआरमध्ये करण्यात आला होता. याप्रकरणी तपासणी केली असता, शहा आणि रेड्डी यांचा या प्रकरणात कोणताही समावेश नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या दोघांची नावे एफआयआरमधून वगळली आहेत. उर्वरित नेत्यांविरोधात खटला सुरू राहणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT