narendra modi 
देश

सावरकरांच्या कवितेमुळे हृदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं - PM मोदी

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय अधिवेशना दरम्यान राज्यसभेत भाषण दिले. लोकसभेतील भाषणाची चर्चा सुरू असतानाच पंतप्रधानांचं दुसरं भाषण गाजतंय. या भाषणातही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने श्रमिक ट्रेन्स युपी आणि बिहारला सोडल्यामुळे देशात कोरोना वाढला, असं त्यांनी म्हटलं होतं. (Narendra Modi on Lata Mangeshkar)

यानंतर सर्व स्तरांतून त्यावर प्रतिक्रिया आल्या. आज राज्यसभेत बोलत असताना, गोव्याच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने लता मंगेशकर कुटुंबीयांचा अपमान केल्याची टीका मोदींनी केली. (Narendra Modi Rajyasabha Speech)

सावरकरांची कविता गायल्याने हृदयनाथ मंगेशकरांना गोव्याच्या आकाशवाणीतून काढलं,अशी टीका मोदींनी केली. तत्कानील काँग्रेस सरकारने ही कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस घराण्याने लता मंगेशकर कुटुंबीयांचा अपमान केला. त्यांच्या कुटुंबासोबत काँग्रेसने कसा व्यवहार केला, हे देखील पाहायला पाहिजे.

हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडीओमधून काढण्यात आलं. त्यांनी वीर सावरकर यांची देशभक्तीपर कविता ऑल इंडिया रेडिओवर म्हटली होती. त्यामुळे काँग्रेसने ही कारवाई केली, असं मोदींनी म्हटलं.

'सरदार पटेल यांची रणनिती वापरली असती तर गोवा लवकर स्वतंत्र झाला असता'

गोवामुक्तीला ६० वर्ष झाले आहेत. गोव्याचे लोक ऐकत असतील. सरदार पटेल यांनी हैदराबादसाठी रणनिती आखली होती. जुनागढसाठी पुढाकार घेतला. त्यांची प्रेरणा घेऊन गोव्यासाठी तशी रणनिती बनवली असती तर गोव्यात भारताच्या स्वातंत्र्यानंतर १५ वर्षापर्यंत गोवा गुलामीत नसता.

तेव्हाचे पंतप्रधान पंडीत नेहरू आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विचार करायचे. त्यामुळे गोव्यात जे व्हायचे ते होऊ देत. पण, त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी गोव्याकडे लक्ष दिलं नाही. त्यावेळी आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं, की सेना पाठवणार नाही. १५ ऑगस्ट १९५५ मध्ये पंडीत नेहरूंनी म्हटलं होतं, आम्ही गोव्यात लष्कराची कारवाई करू असं समजू नका. आम्ही लष्कर पाठवणार नाही. आम्ही शांततेने सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू, हे पंडीत नेहरूंचं लाल किल्ल्यावरच भाषण मोदींनी संसदेत वाचून दाखवलं. तसेच काँग्रेसने गोव्यावर अत्याचार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT