देश

'मोदी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घुसलेत'; राहुल गांधींचं टीकास्त्र

विनायक होगाडे

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज जवळपास १४ विरोधी पक्षांनी जंतर-मंतर मैदानात आंदोलन केले. यावेळी खासदारांनी 'सेव्ह फार्मर्स, सेव्ह इंडिया'च्या घोषणा दिल्या. राहुल गांधींसोबत जंतर-मंतरवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय की, मी या ठिकाणी शेतकऱ्यांचं समर्थन करायला आलो आहे. सरकारला काळे कृषी कायदे रद्द करायलाच हवेत, त्यानंतरच हे आंदोलन बंद होईल. पेगॅसस प्रकरणावरुन नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधीनी टोला हाणत म्हटलंय की, आम्हाला पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर चर्चा करायची आहे. मात्र, केंद्र सरकारला ही चर्चा होऊच द्यायची नाहीये. नरेंद्र मोदी सध्या प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये घुसलेले आहेत.

विरोधकांच्या या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, समाजवादी पार्टी, द्रमुक, राजद सहित इतर अनेक डाव्या पक्षांचे नेते सामील होते. मात्र, या आंदोलनात आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि बसपाचे नेते सामील झाले असल्याचं दिसून आलं नाही.

या आंदोलनात राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, संजय राऊत, मनोज झा, द्रमुक नेत्यांसहित इतर अनेक नेते सामील आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी विरोधकांच्या या पाठिंब्याबद्दल स्वागत केलं आहे. मात्र, राकेश टिकैत यांनी म्हटलंय की, त्यांनी आपल्या मंचावर कोणत्याच राजकीय नेत्याला स्थान दिलं नाहीये. सगळे नेते दर्शकांच्या ओळीत बसलेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT