odhisha teacher murder case sakal media
देश

ओडीशा शिक्षिका खून प्रकरण; नड्डा यांच्याकडून समिती स्थापन

ओडीशातील शिक्षिकेचे अपहरण आणि मृत्युप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ओडीशातील शिक्षिकेचे अपहरण आणि मृत्युप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. याप्रकरणी गृह मंत्री दिब्याशंकर मिश्रा यांचा हात असल्याचा भाजप महिला मोर्चाचा आरोप असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडे भाजप महिला मोर्चाने केली आहे.

कालाहंडी लोकसभा मतदारसंघातील जुनागड विधानसभा क्षेत्राच्या महालिंग विभागात घडलेल्या या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या महिन्याच्या प्रारंभी २४ वर्षीय शिक्षिका मामिता मेहेर यांचा अर्धवट जळालेला मृतदेह कालाहंडीमधील स्टेडियजवळील खड्यात आढळला. त्या बालनगीर जिल्ह्यातील तुरीकेला तालुक्याच्या रहिवासी होत्या. महालिंग विभागातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत त्या शिकवायच्या. शाळेचा मालक गोबिंद साहू छळ करायचा अशी तक्रार मामिता यांच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानंतर मामिता बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून साहूला अटक करण्यात आली, मात्र तो पोलिस कोठडीतून पळाला. नंतर त्याला पकडण्यात आले.

नड्डा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. समितीत लोकसभेच्या खासदार सुनीता दुग्गल, भाजपच्या महिला शाखेच्या अध्यक्षा वनाती श्रीनिवासन आणि आमदार रुप्रा मित्रा यांचा समावेश आहे. हे सदस्य घटनास्थळी जातील. स्थानिकांकडून माहिती घेऊन ते नड्डा यांना सविस्तर अहवाल सादर करतील.

मुलींना गुणांचे आमिष दाखवून...

शाळेचा मालक गोबिंद साहू विद्यार्थिनींना परिक्षेत चांगले गुण देण्याचे आमिष दाखवायचा आणि त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ओढायचा असा खळबळजनक आरोप भाजप महिला मोर्चाने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या आवारातूनच सेक्स रॅकेट चालविले जायचे. राज्याच्या गृह मंत्र्यांचाच वरदहस्त असल्यामुळे हे प्रकार सर्रास सुरु होते, असाही आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT