Congress Government esakal
देश

पंचहमी योजनांसाठी काँग्रेस सरकारने 'एससी-एसटी'चे तब्बल 14 हजार कोटी वापरले? राष्ट्रीय आयोगानं धाडली नोटीस

आयोगाने स्वेच्छेने प्रकरण हाती घेतले आणि प्रसार माध्यमातील माहितीच्या आधारे नोटीस पाठवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

१४,७३०.५३ कोटी रुपये अनुसूचित आणि अनुसूचित जमाती (एससी-एसटी) यांच्यासाठीच्या योजनांसाठी राखून ठेवलेला निधी सरकारच्या पाच हमी योजनांसाठी वापरला जात असल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे.

बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारने (Congress Government) अनुसूचित जमातीच्या उपयोजनांसाठीचे राखून ठेवलेले १४ हजार कोटी रुपये आपल्या पंचहमी योजनांसाठी वापरल्याबाबत सात दिवसांत सर्वसमावेशक अहवाल सादर करावा, अशी नोटीस राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (National Commission for Scheduled Castes) राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी असलेला निधी (SC-ST Development Fund) अन्य कामांसाठी वापरला जात असल्याचा आक्षेप घेत आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. आयोगाने स्वेच्छेने प्रकरण हाती घेतले आणि प्रसार माध्यमातील माहितीच्या आधारे नोटीस पाठवली आहे.

१४,७३०.५३ कोटी रुपये अनुसूचित आणि अनुसूचित जमाती (एससी-एसटी) यांच्यासाठीच्या योजनांसाठी राखून ठेवलेला निधी सरकारच्या पाच हमी योजनांसाठी वापरला जात असल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रीय आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT